समर्थकांशी चर्चा करूनच पुढील भूमिका घेणार : बच्चू कडू

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतले असले तरी आपण आपल्या समर्थकांशी चर्चा करूनच पुढील भूमिका घेणार असल्याची माहिती आज बच्चू कडू यांनी दिली आहे.

खोक्यांच्या आरोपावरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादात काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली. यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद संपुष्टात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आज सकाळी आमदार रवी राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना आपला खोक्यांचा आरोप मागे घेत दिलगिरी व्यक्त केली.

यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यात ते म्हणाले की, रवी राणा यांनी माफी मागितली ही बरे झाले. मात्र कार्यकर्ता हा माझा आत्मा असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आपली पुढील वाटचाल ठरवणार असल्याचे ते म्हणाले. आपण आज सायंकाळी अमरावती येथे पोहचणार आहेत. यानंतर उद्या सकाळी आपल्या सर्व समर्थकांसह चर्चा करून मगच आपण आपली भूमिका स्पष्ट करू असे ते म्हणाले. राणा यांनी केलेल्या आरोपांवरून आपण गप्प राहिलो असतो तर चुकीचा संदेश गेला असता. ही बदनामी आपण सहन करणार नसल्यामुळेच आपण आक्रमक भूमिका घेतल्याचेही ते म्हणाले.

Protected Content