यावल प्रतिनिधी । कचरा गाडीत चुकून फेकून दिलेल्या पैश्यांची पिशवी यावल नगरपरिषेदचे सफाई कर्मचाऱ्याने परत केल्याने प्रामाणिकपणाचे कौतूक केले आज आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील विस्तार वसाहतीतील व्यासनगर परिसरात यावल नगरपरिषदेची घनकचरा संकलन करणारी घंटागाडी कचरा संकलन करत असतांना तेथील भूषण चव्हाण यांच्या घरकाम करणारी महिला रेणुका डांबरे यांची एक पिशवी चुकून घंटागाडीत फेकली गेली. सदरहू पिशवीत रोख रक्कम ५ हजार रूपये, एक मोबाईल व मूल्यवान वस्तू असा ऐवज होता. गाडी तिथून गेल्यानंतर त्यांच्यानंतर लक्षात आले, सदर गाडीचा शोध घेतला असता गाडी ही त्याच परिसरात फिरत असतांना कर्मचाऱ्यांना फोन करण्यात आले. गाडी आहे त्या ठिकाणी थांबून गाडीत कर्मचारी यांनी व महिलेने कचऱ्याच्या गाडीत पिशवीचा शोध घेतली असता सदरहू पिशवी मिळून आली. पिशवी मिळाल्यानंतर महिलेच्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नव्हते पिशवी मिळाल्यानंतर महिलेला खूप आनंद झाला व तीने नगर परिषदचे सफाई कर्मचारी वहीद शेख व आकाश गजरे या कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानून आपल्या घरी मार्गस्थ झाली. सफाई कर्मचाऱ्यांचे या कार्याचे सर्वदूर कौतुक होत आहे.