सणासुदीच्या हंगामासाठी विशेष ट्रेन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । रेल्वेने सणासुदीचे दिवस पाहता काही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दररोज चालणाऱ्या ट्रेन असून काही साप्ताहिक ट्रेन आहेत. सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

नव्या ट्रेनमध्ये कोटा ते वैष्णोदेवी कटरा आणि उधमपूरसाठी वेगवेगळ्या ट्रेनचा समावेश आहे. प्रतापगड येथून भोपाळदरम्यान आठवड्यातून तीन ट्रेन चालवल्या जाणार आहेत. एक ट्रेन जबलपूरहून कटऱ्यालाही जाणार आहे. बरेलीहून भुजदरम्यान देखील एक फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन रविवारपासून सुरू होत आहे. सूरतहून छपरा, गोरखपूरहून अहमदाबाद, मुजफ्फरहून दिल्लीसाठी विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. या सर्व गाड्यांमध्ये कोविड-१९ ची काळजी घ्यावी लागणार आहे.

 

रेल्वेने दर शनिवारी कोटा ते श्री माता वैष्णोदेवी कटरा अशी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कटराहून परतीचा प्रवास दर रविवारी होईल. २८ ऑक्टोबरपासून कोटा-उधमपूर-कोटा साप्ताहिक ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन कोटा येथून दर बुधवारी सुटेल आणि उधमपूरहून गुरुवारी रवाना होईल.
भोपाळहून आठवड्यातून तीन दिवस प्रतापगड जंक्शनसाठी ट्रेन सुटेल. २५ ऑक्टोबरपासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी भोपाळहून ट्रेन सुटेल. परतीचा प्रवास सोमवार, बुधवार आणि शनिवारी होईल. मध्य प्रदेशातील जबलपूरहून कटरा प्रवासासाठी साप्ताहिक ट्रेन २७ ऑक्टोबरपासून धावणार आहे. ही ट्रेन मंगळवारी रवाना होईल. कटरा येथून जबलपूरला जाणारी ट्रेन दर बुधवारी सुटेल.

उत्तर प्रदेशातील बरेलीहून गुजरातमधील भुजसाठी आठवड्यातून ४ ट्रेन २५ ऑक्टोबरपासून धावणार आहेत. या ट्रेन सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी सुटतील.गुजरातमधील सूरतहून बिहारमधील छपरा येथे जाण्यासाठी क्लोन सुपरफास्ट विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. ही ट्रेन दोन दिवस जौनपूर येथे थांबणार आहे.उत्तर प्रदेशातील गोरखपूरहून गुजरातच्या अहमदाबादला जाणारी ४ नोव्हेंबर पासून रोज ट्रेन सुटणार आहे. ही ट्रेन माणिकपूर आणि खंडवा येथेही थांबेल.

मुझफ्फर आणि दिल्लीदरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनची वेळ बदलण्यात आली आहे. हाजीपूरहून ही ट्रेन आता संध्याकाळी ५.१५ ऐवजी संध्याकाळी ४.२५ वाजता सुरू होईल.

Protected Content