जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सट्ट्याचा आकडा कोणता येणार आहे या कारणावरून तीन जणांनी एका तरूणाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता हॉस्पिटलसमोर घडली. याप्रकरणी गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, नरेश मनोहर जावळे (वय-३७) रा. नवल कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार १२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता हॉस्पिटलजवळ आला होता. त्यावेळी मोईन शहा, सोनी आणि एक अनोळखी यांनी नरेश जावळे याला सट्ट्याचा आकडा काय येणार आहे असा विचारणा केली. त्यावर मला माहित नाही असे नरेश जावळेने सांगितले. याचा राग आल्याने तिघांनी नरेशला शिवीगाळ करून मारहण केली. तर यातील मोईन शहा याने रस्त्यावर पडलेला फरशीचा तुकडा डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या नरेशला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
याबाबत गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नरेश जावळे याने दिलेल्या फिर्यादीवरून मोईन शहा, सोनी आणि एक अनोळखी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.