सकाळी मागणी, दुपारी निधीचे पत्र व संध्याकाळी कामाचे भूमिपूजन !

 

 

 

 

चाळीसगाव : प्रतिनिधी ।  रस्त्याच्या मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना व ठेकेदाराला तात्काळ पत्र देत त्याच दिवशी कामाचे भूमिपूजन करून काल आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावकरांना सुखद धक्का  दिला

 

राजकारणी लोकांच्या बोलण्याला  अपवाद ठरेल असा अनुभव चाळीसगाववासियांना वेळोवेळी येत असतो. शहरालगत पावर हाऊस व ओझर शिवारात बहुतांश शेती  चाळीसगाव शहरात पूर्वापार राहणाऱ्या चौधरी समाजाची आहे.

या शेतांमध्ये जाण्यासाठी  मुख्य रस्ता हा दगडमातीचा कच्चा असल्याने व त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी शेतकरी ४० वर्षांपासून करत होते.

 

मागील २ दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची  , गुरा ढोरांची व  मजुरांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने पायी चालणेदेखील कठीण झाले होते. हा त्रास शेतकऱ्यांना दर पावसाळ्यात होत असल्याने शेतमाल वेळेत बाजारात आणणे दुरापास्त होत होते.

 

या त्रस्त शेतकऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांची २९ मेरोजी सकाळी भेट घेतली व स्थानिक विकास निधीतून डोहर वाड्यापासून ते नाल्यापर्यंतचा रस्ता खडीकरण करून देण्याची विनंती केली. आमदार मंगेशदादा यांनी देखील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली समस्या समजून घेतली व त्यांना विचारले की किती निधी दिला तर हा रस्ता तयार होईल. त्यावर शेतकऱ्यांनी सांगितले की खडीकरण करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल जवळच उपलब्ध आहे हे काम आम्ही कुठल्याही आर्थिक दृष्टिकोन ठेवून न करता स्वतः उभे राहून करणार असल्याने शासनाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त आणि टिकाऊ काम आम्ही करून घेऊ कारण या रस्त्यावरच आमचे शेतीचे अर्थकारण अवलंबून आहे.

आमदार मंगेशदादा यांनीदेखील शेतकऱ्यांची प्रामाणिक तळमळ बघत तात्काळ ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले  काही दिवसातच पावसाळा सुरू होणार आहे. शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना आता शेतात जास्त जावे लागणार आहे. त्यामुळे निधीचे पत्र दिल्यानंतर त्या कामाला मान्यता मिळण्यासाठी  एक ते दीड महिना लागेल, काम होईपर्यंत अर्धा पावसाळा निघून जाईल. म्हणून आमदार मंगेशदादा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार विजय चौधरी यांना बोलावून घेत त्यांना कामाची जबाबदारी दिली  “तुम्ही आताच दुपारी माझ्या निधीचे ५ लाखांचे पत्र घ्या, तो निधी मंजूर होईल तेव्हा होईल, तुमचा कष्टाचा एक रुपया बुडणार नाही, त्याची जबाबदारी मी घेतो मात्र मला या शेतरस्त्याचे काम आजच संध्याकाळी सुरू झालेल पाहिजे. मी स्वतः संध्याकाळी तेथे नारळ फोडायला येतो. असे त्यांनी ठेकेदाराला सांगितले “आमदार मंगेश चव्हाण  यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तडकाफडकी घेतलेला निर्णय पाहून उपस्थित शेतकरी देखील भारावले.

ठेकेदार चौधरी यांनी देखील आनंदाने ही जबाबदारी स्वीकारत त्याचदिवशी संध्याकाळी कामाला सुरुवात केली.

आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते नारळ फोडून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले.

 

यावेळी जेष्ठ नगरसेवक राजेंद्र  चौधरी, नगरपालिका गटनेते संजय  पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर  पाटील, नगरसेवक बापू अहिरे, सामाजिक कार्यकर्ते सदानंद चौधरी, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, अनिल ठाकरे चौधरी, अमोल चौधरी, भाजपा कार्यकर्ते मयूर चौधरी यांच्यासह शेतकरी सचिन चौधरी, उमाकांत चौधरी, दत्तात्रय चौधरी, दिनकर चौधरी, गोपाल चौधरी, सुनील चौधरी, चंद्रकांत चौधरी, पोपट चौधरी, मोहन चौधरी, भूषण चौधरी, चेतन चौधरी, रोहिदास चौधरी, अनिल चौधरी, सुनील चौधरी, नामदेव चौधरी, सोनू चौधरी, सुदाम चौधरी, अशोक चौधरी, लक्ष्मीकांत चौधरी, जिभाऊ  चौधरी, धनंजय चौधरी, प्रल्हाद चौधरी आदी उपस्थित होते.

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सरकारी काम दहा महिने थांब न म्हणता, “द्यायचे तर द्यायचेच, बोललो तर बोललो” म्हणत सकाळी मागणी, दुपारी निधीचे पत्र आणि संध्याकाळी कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात केल्याने पुन्हा एकदा  धडाकेबाज स्टाईलची चाळीसगावकराना अनुभूती दिली आहे.

 

Protected Content