संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

 

नवी दिल्ली । अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन अखेर रद्द करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसमुळे यंदाचं संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलीं आहे. जोशी यांनी सांगितलं की, कोविड १९चा प्रसार टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हे अधिवेशन न घेण्याबाबत मत मांडलं होतं.

जोशी यांनी सांगितलं की, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या वादग्रस्त नवीन शेतीविषयक कायद्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन घ्यावं अशा मागणीचं पत्र दिलं होतं. मात्र कोरोनामुळं अधिवेशन होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, आपण सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे आणि कोविडमुळे अधिवेशन घेण्याबाबत सर्वाचं एकमत आहे. यानंतर आता जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.

Protected Content