चीनचेही सैनिक आपले ताब्यात होते, ज्यांना नंतर आपण सोडून दिले : केंद्रीय मंत्री व्ही के सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनसोबतच्या झटापटीनंतर चीनचेही सैनिक आपले ताब्यात होते, ज्यांना नंतर आपण सोडून दिले, अशी धक्कादायक माहिती माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीय.

 

माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंह म्हणाले, त्या रात्री गलवान खोरीत नदीच्या किनारी जवळपास सहाशे लोकांचा जमाव अचानक अंधारात एकमेकांना भिडले. यावेळी अनेक सैनिक ऐकमेकांच्या बाजूला गेले. चीनने आपल्या काही सैनिकांना बंदी बनवले होते. तसेच चीनचे काही सैनिक आपल्या ताब्यात होते. मात्र, हे सैनिक ऐकमेकांना सुपूर्द करण्यात आले आहे. दरम्यान, चीनने भारताच्या 10 जवानांना बंदी बनवले होते. नंतर त्यांना सोडले. मात्र, दोन्ही देशाकडून या बातमीचे खंडन करण्यात आले होते. मात्र, आता पहिल्यांदा केंद्रातील मंत्र्यांनी सैनिकांबद्दल कबुली दिली आहे. तर दुसरीकडे 10 जवानांची काल सुटका झाल्याच्या बातम्यांवर सरकारचे अद्याप काहीच स्पष्टीकरण का नाही? नेमकं सत्य काय आहे हे का सांगितलं जात नाहीय?, असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.

Protected Content