प्रकाशाच्या वेगाने मिळणार इंटरनेट स्पीड ; जिओ फायबर योजनेची घोषणा

70639552

मुंबई (वृत्तसंस्था) ‘प्रकाशाच्या वेगाचा स्पीड’ अशा शब्दात रिलायन्स उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या बहुप्रतिक्षीत जिओ फायबर योजनेची घोषणा आज केली. जिओच्या लॉंचिंगच्या तिसऱ्या वर्धापनदिनी म्हणजेच येत्या ५ सप्टेंबरपासून जिओ फायबर लाँच होणार आहे.

 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मुकेश अंबानी यांनी आपल्या शेअर होल्डरला (समभागधारक)संबोधित केले. यावेळी त्यांनी प्लान्स अगदी ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात मिळणार असल्याचे सांगितले. रिलायन्स इंडस्ट्रीजची आज मुंबईत ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यात ही घोषणा करण्यात आली. रिलायन्स फायबरमध्ये १ जीबीपीएसपर्यंतचा अफाट इंटरनेटचा स्पीड ग्राहकांना मिळणार आहे.

 

यावेळी त्यांनी रिलायंस कंपनीच्या वाटचाल आणि यशाबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच सौदी अरॅमकोशी तेलाच्या क्षेत्रात रिलायन्सची भागीदारी झाल्याची माहिती यावेळी दिली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड समूहाच्या सोमवारी मुंबईत झालेल्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी उद्योगसमूहाच्या भविष्यातील वाटचालीविषयी अनेक मोठ्य़ा घोषणा केल्या. यावेळी त्यांनी रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून देशात सर्वाधिक मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर केले. ही केवळ रिलायन्स नव्हे तर देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक असेल. त्यासाठी रिलायन्सने सौदी अराम्को या कंपनीशी खनिज तेलापासून रसायने तयार करण्याच्या क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारीचा करार केला आहे. त्यानुसार सौदी अराम्को ७५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून रिलायन्समधील २० टक्के समभाग विकत घेणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी जाहीर केले.

Protected Content