नागरिकत्व सुधारणा कायदा : आंदोलनात सहभागी जर्मन विद्यार्थ्यास देश सोडून जाण्याचे आदेश

EMfHxolUwAAZbHz

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मद्रास आयआयटीच्या कॅम्पसमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाला म्हणून जर्मन विद्यार्थ्याला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेकब लिंथेंडल असे विद्यार्थ्याचे नाव असून तो मद्रास आयआयटीत भौतिकशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे (मास्टर्स) शिक्षण घेत होता.

 

आयआयटी मद्रासमध्ये शिक्षण घेणारा जॅकब सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधातील आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलनातील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. यानंतर लगेचच त्याला भारत सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला. जॅकबने सीएए आणि एनआरसीची नाझी राजवटीशी तुलना केली होती. जॅकबने काही दिवसांपूर्वी आयआयटी कॅम्पसमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. यानंतर जेकबला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने जेकबला सोमवारी चेन्नई विमानतळावर गाठून याविषयी विचारणा केली. तेव्हा जेकबने म्हटले की, चेन्नईतील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (एफआरआरओ) आपल्याला यासंबधीचे तोंडी आदेश देण्यात आले. दरम्यान, मद्रास आयआयटीतील आंदोलनावेळी जेकब लिंथेंडलने एक फलक झळकावला होता. त्यावर ‘१९३३ ते १९४५ आम्ही याच परिस्थितीत होतो ‘, असा सूचक संदेश लिहला होता. या माध्यमातून जर्मनीतील नाझी राजवट आणि भारतातील सद्यस्थितीची अप्रत्यक्ष तुलना करण्याचा प्रयत्न जेकबने केला होता.

Protected Content