भुसावळात केंद्रीय पथकाची पाहणी; सुचविल्या उपाययोजना ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकाने आज शहरातील कोविड केअर सेंटर्ससह कंटेनमेंट झोनमध्ये पाहणी केली. यातील अधिकार्‍यांनी स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देखील दिल्या.

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून केंद्रीय पथक कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल यासाठी दाखल झाले आहे. शनिवारी या पथकाने जळगाव शहराची पाहणी केली. आज रोजी हे केंद्रीय पथक भुसावळ शहरात दाखल झाले. पथकाने भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील जवाहर नदयोय विद्यालयातील केव्हिड सेंटरची पहाणी केली.त्यानंतर भोई नगरातील कंटेन्मेंट झोनची पाहणी केली. यानंतर रेल्वे हॉस्पिटलमध्ये असणार्‍या कोविड केअर सेंटरला भेट दिली. पथकातील अधिकार्‍यांनी रेल्वे हॉस्पिटलच्या बाहेर उभे राहूनच कोरोना रुग्णासाठी केलेल्या व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. तसेच दवाखान्यात रुग्णासाठी असणार्‍या खाटा, व्हेंटिलेटर यांचीही माहिती जाणून घेतली. दरम्यान, रेल्वे रूग्णालयातील कोविड सेंटरच्या मध्ये न जात बाहेरूनच पथकाने पाहणी करून प्रांताधिकारी कार्यालयातील बैठकीस हजेरी लावली.

यानंतर प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्या कार्यालयात डॉक्टर व अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये भुसावळातील कोरोना रुग्णांचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मध्ये प्रवेश नाकारण्यात आला. या बैठकीत प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने,तहसीलदार दिपक धिवरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण सावंत-पाटील ,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे तसेच कर्मचारी उपस्थित होते. कार्यालयात नेमक्या कुठल्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती देण्यात आली नाही. प्रसार माध्यमांना केंद्रीय पथकाने माहिती देण्यात टाळाटाळ केली. यानंतर पथक जळगाव रवाना झाले.

खाली पहा : केंद्रीय पथकाच्या पाहणीबाबतचा व्हिडीओ.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/638865793649009

Protected Content