मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय स्वातंत्र्य दिनाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी आमदार छगन भुजबख यांनी केली आहे.
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल केलेले वक्तव्य हे वादाच्या भोव र्यात सापडले असून त्यांच्यावर चौफेर टिका होत आहे. यात आता माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबख यांनी देखील त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भिडे हे संभाजी नाव वापरून बहुजन तरूणांना भडकावत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी केलेले वक्तव्य हे दुसर्यांनी केले असते तर त्यांच्यावर लागलीच कारवाई झाली असती. मात्र त्यांनी केलेले वक्तव्य हे गंभीर असल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झल्याबद्दल त्यांनी टिका केली आहे. पहिल्या पावसात कुठल्याही शहरात रस्ते तुंबण्याचे प्रकार घडतात. यावर शासकीय अधिकार्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. ट्रॅफिक पोलिसांना खड्डा कुठे आहे, याची माहिती असते. त्यांनी महापालिका अधिकार्यांना ताबडतोब कल्पना द्यावी. असं ते म्हणालेत.