संतापजनक : चुलत भावाकडून बहिणीवर अत्याचाराचा प्रयत्न

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती संभागी नगर येथे वास्तव्याला असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आजीकडे असतांना तिच्याच चुलत भावाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर येथे राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आलेली होती. त्यावेळी तिचा चुलत भाऊ याने ५ मे रोजी ११ वाजता पिडीत मुलगी ही घरात झोपलेली असतांना अचानक येवून तिच्याजवळ झोपला व अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या नातेवाईकांना सांगितला. दरम्यान, पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून चुलत भाऊ याच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

Protected Content