


भुसावळ, प्रतिनिधी । येथील श्री गणेश कॉप्युटरमध्ये आता सर्व बँकेचे पैसे काढणे, जमा करणे, लाईट बिल, तात्काळ पैसे पाठविणे, फोन बिल, खाते उघडणे. इ.सर्व कामे रेल कामगार सेना भुसावळ मंडळ अध्यक्ष ललित कुमार मुथा यांच्या हस्ते दि. ३ रोजी सुरु करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध सेवा सुविधाला लागणारा अतिरिक्त चार्ज संचारबंदी असेपर्यंत मोफत करण्यात आला आहे. या वेळेस श्री गणेश कम्प्यूटरचे संचालक अमोल माळी, सत्यजीत वाणी व एमओएचचे कर्मचारि रणजीतसिंग चौधरी हे उपस्थित होते. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे सध्या सर्व नागरिक अतिशय द्विधा मनस्थितित आहे. परिस्थितिचे गांभीर्य ओळखून गणेश कम्प्यूटरचे संचालक अमोल माळी यांनी जनसेवा म्हणून कोरोना व्हायरस या महामारीचे संकटटळेपर्यंत सर्व नेट बेंकिंगचे व्यवहार बिना कमीशनचे करण्यात येतील असा निर्धार अमोल माळी यांनी व्यक्त केला आहे. तरी नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ललितकुमार मुथा यांनी केले आहे.


