संचारबंदी : रावेर तालुक्यात तोंडाला मास्क न बांधल्याने २० जणांवर कारवाई

 

रावेर, प्रतिनिधी । रावेर, आहीरवाडी,के-हाळामध्ये तोंडाला माक्स न बांधणाऱ्या २० जणांवर निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांनी कारवाई केली असून दंड म्हणून त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे प्रमाणे दहा हजार रुपये वसूल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शना खाली आज रावेर शहर,आहिरवाडी,के-हाळामध्ये तोंडाला माक्स न बांधणाऱ्या २० जणांवर निवासी नायब तहसिलदार यांच्या पथकाने कारवाई केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत मंडळ अधिकारी सचिन पाटील, शिपाई श्री भालेराव यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली आहे.

Protected Content