यावल, प्रतिनिधी । कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून या काळात आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असताना पोलिस प्रशासनाच्या मदतीला आता देशाच्या सुरक्षेसाठी सीमारेषेवर
लढणारे व देशाचे रक्षण करणारे सेवानिवृत्त माजी सैनिक पुढे सरसावले आहेत.
यासंदर्भातील वृत्त असे की, मागील वीस ते २५ दिवसापासून यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद खंडबहाडे, सहायक फौजदार मुझफ्फर खान यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी बांधव आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांच्या मदतीला माजी सैनिक यांनी धाव घेतली आहे. यात गजानन अढायगे कोळवद, रवींद्र बडगुजर यावल, चरण पारधे यांचा समावेश आहे. तसेच महसूल प्रशासनातर्फे विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, नायब तहसीलदार एम. एम. तडवी, नायब तहसीलदार आर. डी. पाटील तसेच आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बीबी बारेला, वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज एम. तडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ मनीषा महाजन वैद्यकीय अधिकारी डॉ गौरव भोईटे व डॉ नजमा तडवी हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य बजावीत आहे.