भरारी फाऊंडेशन व विर्धिष्णू संस्थेतर्फे आदिवासी पाड्यावर किराणा साहित्याचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भरारी फाऊंडेशन आणि वर्धिष्णू संस्था यांच्यावतीने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजतगयात यावल तालुक्यातील सातपुडा पर्ततराजीत विख्रुरलेल्या आंबापाणी आणि थोरपाणी या आदिवासी भागातील जवळपास १५०० गरजू कुटूंबांना १५ दिवस पुरेल एवढे अन्न व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतराजीत विखुरलेल्या अंबापाणी व थोरपाणी या आदिवासी गावातील १५० परिवारंपर्यंत अन्नसामुग्री पोहचवण्यात आली. उदयोजक रजनीकांत कोठारी, कृषी अधिकारी अनिल भोकरे, सुभाष राऊत, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, प्रशांत पाटील, मयूर चौधरी, डॉ.सुभाष पवार, अजय पाटील, एम.एन.ॲग्रो इंडस्ट्री यांचे सहकार्य मिळत आहे.

भरारी फाऊंडेशनचे दीपक परदेशी, अद्वैत दंडवते, चेतन पाटील गुलाब तडवी यांनी आदिवासी परिवारंपर्यंत ही सामग्री पोहचवली. तर किट पॅकिंगसाठी प्रणाली सिसोदिया, मंगला जाधव, अनिता साळवे, विजया राधे, सिद्धू, महेश जोशी, पूनम गजरे, योगेश हिवरकर मेहनत घेत आहेत. आजपर्यंत विविध दुर्लक्षित घटक शोधून विविध स्तरावरील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहचवण्याचा प्रयत्न या संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Protected Content