केंद्राच्या सुचना पाळण्याची खबरदारी घेतली तर करोनावर आपण मात करू : शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) तीन आठवड्यानंतर अधिक सुधारणांसाठी हा कालावधी नाईलाजाने ३ आठवड्यांसाठी वाढवावा लागला. आपल्याकडे ३ मेपर्यंत अजून १२ दिवसांचा कालावधी आहे. केंद्राच्या सुचना पाळण्याची खबरदारी घेतली तर करोनावर आपण मात करू शकू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, नियमावलीत शिथिलता आणण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल याबाबत मनात शंका नाही. काळजी घ्या अजिबात बाहेर पडू नका असंही त्यांनी नमूद केलं. मुंबई, पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी करा, असेही त्यांनी यावेळी म्हटले.महाराष्ट्रात वाढणारा आकडा थांबवायचा कसा यासाठी उपाययोजना कराव्या लागतील, असंही शरद पवार म्हणाले. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे या ठिकाणी कठोरपणे नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे. आकडा आपण शून्यावर आणण्याच्या आव्हाना सामोरे जायचे आहे. पालघरला जे झाले त्याचा जो काही संबंध असेल तर त्याची चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर काही तासांमध्ये राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली आहे. अशी प्रकरणं घडायला नको,असेही पवार यांनी म्हटले.

Protected Content