संचारबंदी : कासोदा येथे राम नवमीनिमित्ताने गरिबांना अन्नवाटप

 

कासोदा ता.एरंडोल, प्रतिनिधी । येथील कोरोना दक्षता समितीने श्रीराम नववीनिमित्ताने गरिबांना भाजी पोळीसह टरबूजचे अन्नदान करण्यात आले.

कोरोनानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे . याकालावधीत शासनासह पोलीस प्रशासनाची दमछाक होत आहे. हे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनास मदत व्हावी म्हणून कासोद्यातील तरुणांनी पुढाकार घेतला व तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांनी आयकार्ड बनवून दिले. यामुळे पोलीस प्रशासनास मदत होत आहे. दि. २ एप्रिल रोजी असलेल्या श्रीराम नवमी सार्वजनिक स्वरूपात साजरी न करता कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोरोना दक्षता समितीने गरीबांना अन्नदान केले. कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या कासोदा येथील फासेपारधी नगर व भिल्लवस्ती येथील नागरिकांना एक दिवसीय जेवण म्हणून शेव भाजी पोळी , टरभुज व फरसाणचे पाकिटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कोरोना दक्षता समितीचे सदस्य , एरंडोल बस स्थानक प्रमुख गोविंद बागुल , शैलेश पांडे, पत्रकार राहुल मराठे , शैलेश मंत्री , हरीश पटेल , संजय जमादार , गोविंद शेलार , दिपक शिंपी , शाम पाटील , स्वप्निल बियाणी, पत्रकार सागर शेलार, नाना शिंदे, उमेश नवाल, बंटी ठाकरे, वासुदेव वारे , गोविंद चौधरी, गोविंद अग्रवाल, मनोज पिंगळे, पवन राजपूत उपस्थित होते.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content