पारोळा, प्रतिनिधी । शहरातील व परिसरातील सर्व गरजू कुटुंबांसाठी श्री पद्मावती माता ग्रुप पारोळातर्फे घरपोच जेवणाचे पाकीट पुरविण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशभर लॉक डाऊन केले आहे. या लॉक डाऊनमध्ये म्हणजेच संचारबंदीमध्ये गरीब लोकांना आपल्या दैनंदिन गरजा भागविणे मुश्किल झाले आहे. संचारबंदीच्या काळात अशा गरजू कुटुंबासाठी श्री पद्मावती माता ग्रुपतर्फ घरपोच जेवण पोहचविले जाणार आहे. अशा गरजूंनी तुषार ओंकार भावसार ८३०८१६७५७५, योगेश नाना चौधरी ९४२०९३८९०८, संदेश पांडुरंग मालपुरे ९०२८१५३३३८, दिपक देवराम चौधरी ९५९४९७२५०५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.