श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे हॉकी संघ व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीड दिन आज रविवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, पोलीस निरीक्षक विलास शेंडे, उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रफिक तडवी, हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, सहसचिव प्राध्यापक डॉ.अनिता कोल्हे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, आयशा साजिद, कांचन चौधरी व स्पोर्ट्स हाऊसचे ॲड. आमीर शेख यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला महापौर यांच्याहस्ते पुजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात महापौर जयश्री महाजन यांनी लवकरच महापौर चषक स्पर्धा तसेच महानगरपालिकेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी मनपा व राज माध्यमिक विद्यालय प्रयत्न करू असे आश्वासन दिले.राष्ट्रीय खेळाडू शादाब सय्यद यांनी मेजर ध्यानचंद यांची माहिती विषद केली. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विषद केले. पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी क्रीडा व करिअर याबाबत मार्गदर्शन करून आपले उदाहरण स्पष्ट केले. शिवछत्रपती अवॉरडी अंजली पाटील ,यांनी सुद्धा आपल्या मनोगतात द्वारे खेळाडूंना मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी एम.के.पाटील, सुजाता गुल्हाने, अरविंद खांडेकर,  गोविंद सोनवणे, विनोद कुलकर्णी, विनोद माने, सेंटर रेल्वेचे अकील शेख, भुसावळचे शोएब खान, मजाज खान, आमिर खान, जुबेर खान, इम्रान बिस्मिल्लाह, शारीक सैयद, मुख्तार पिंजारी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारुक शेख यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी सौ सुजाता गुल्हाने यांनी केले.

Protected Content