श्री गुरूनानक दरबार साहिब बहुउद्देशीय संस्थेतर्फे हैदराबाद घटनेचा निषेध(व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी |  तेलंगाणा राज्यातील हैदराबाद येथे अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार करून तिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रीया उमटत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार २३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील श्री गुरूनानक दरबार साहिब बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

निवेदनात म्हटले आहे की,तेलंगाणा राज्यातील हैदराबाद येथे अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार करून तिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीवर अत्याचार करणारे नराधमांना अद्याप पोलीसांनी अटक केलेली नाही. दोन्ही संशयित आरोपींना तातडीने अटक करावी, हा खटला जलद न्यायालयात चालवावा, पिडीत मुलीच्या वारसांनी तातडीने शासकीय आर्थीक मदत जाहीर करावी आणि दोन्ही संशयित आरोंपीनाफाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करून तेलंगाणा सरकारचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

या निवेदनावर गुरूचरणसिंग बावरी, राजेंदसिंह टाक, रामसिंह बावरी, दिपकसिंह टाक, दिलीपसिंह बावरी, जसवंतसिंह टाग, बलमासिंह टाग, मानसिंह बावरी, समाधान पाटील, खंडू पवार, कैलास जोशी, जगदीश पाटील, सचिन नाळे, अमित भाटीया, मोहन तिवारी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/688567595843336

Protected Content