Home Cities जळगाव जिल्ह्यात ‘या’ चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जिल्ह्यात ‘या’ चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

0
65


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या बदली करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांची जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे; तर जळगाव जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांची पारोळा पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली.

जळगाव नियंत्रण कक्षातील राहुल सोमनाथ खताळ यांची धरणगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे; तर धरणगावचे शंकर विठ्ठल शेळके यांची मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound