श्री ओंकारेश्वर मंदीरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील रामदास कॉलनीतील श्री ओंकारेश्वर महादेव मंदीरात मंगळवार १ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्ताने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.

 

भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्थान म्हणून ओळख असलेल्या शहरातील रामदास कॉलनी येथील श्री ओंकारेश्वर मंदीरात मंगळवार १ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त भाविकांनी स्वयंभू शिवपिंडाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आले होते. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण संख्या कमी असल्याने महाशिवरात्री महोत्सव कोरोना नियमांचे पालन करून साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

रामदास कॉलनी येथील श्री ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टच्या श्री ओंकारेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नवसातून बांधण्यात आलेले हे मंदिर आहे. या मंदीरात स्वयंभू शिवपिंड स्थापन करण्यात आली आहे. या ठिकाणी महाशिवरात्र, श्रीराम नवमी, श्रीकृष्णा जन्माष्टमी असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार १ मार्च रोजी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत संस्थानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती विश्वस्त जुगल जोशी यांनी दिली.

भाग १

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2494762487320500

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/482079043468698

Protected Content