श्रीराम रथोत्सव पाच पाऊले रथ ओढून साजरा (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । सियावर रामचंद्र की जय, राम राम जय श्री राम, रामचंद्र हनुमान की जय अशा गगनभेदी जयघोषात सनई, चौघड्याच्या निनादात कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीराम मंदिर संस्थानचा श्रीराम रथोत्सव कोरोनाच्या सावटाखाली देखील मोठ्या चैतन्यमय वातावरणात पाच पाऊले रथ ओढून पार पडला.

कोरोनाचा वाढता संसर्ग बघता पोलीस प्रशासनाकडून रथोत्सवाला गर्दी होवू नये यासाठी रथाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करुन याठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची १५० वर्षाची थोर परंपरा लाभलेले श्री राम मंदिर संस्थांतर्फे कार्तीकी एकादशीनिमित्त बुधवारी श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ४ वाजता काकडा आरती व प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता रथ चौकात श्री राम मंदिर संस्थांनचे उत्ताराधिकारी वेदमुर्ती हभप श्रीराम महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळा व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या घोषात रथाची व उत्सवमुर्तीची महापुजा करण्यात आली. यानंतर श्रीराम मंदिरातून संत मुक्ताबाईच्या पालखीतून वाजंत्री व रामनामाच्या जयघोषात वाजगाजत उत्सव मुर्ती रथावर विराजमान करण्यात आली.

प्रमुख अतिथी म्हणून आ. राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून आ. राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित होते. यानंतर महाआरती होवून दुपारी १.१९ मिनीटांनी रथाची महाआरती होवून प्रभू श्रीराम नामाच्या जयघोषात पाच पावले रथ ओढण्यात आला.

कोरोनामूळे १४८ वर्षांची परंपरा खंडीत
रथाला १४८ वर्षाची परंपरा वारंकरी संप्रदायाचे कान्देशातील थोर संत व श्रीराम मंदिर संस्थानचे मुळ सत्पुरुष श्री अप्पा महाराज यांनी सन १८७२ साली हिंदू समाजातील अठरा पगड जाती, एकत्र करून हया रथोत्सवाच्या सोहळयाला प्रारंभ केला होता. १४८ वर्ष पूर्ण झाली असून जळगावकरांच्या असंख्य भाविकांच्या सहकार्याने हा रथोत्सव नंदादिप अखंडपणे तेवत आहे. परंतु यंदा संपूर्ण जगात कोरोनाचे सावट असल्याने १४८ वर्षांपासून सुरु असलेली परंपरा यंदा खंडीत झाली आहे.

कार्तिकी एकादशीला निघणारा एकमेव रथ

जळगाव नगरीत कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला निघणारा जळगावच्या श्रीराम मंदिर संस्थानचा एकमेव रथोत्सव असून या रथोत्सवाला १४७ वर्षांची अखंड परंपरा लाभली असल्याचे श्रीराम मंदिर संस्थानचे विश्‍वस्त तथा मंदिराचे पाचवे वंशज हभप. मंगेश महाराज जोशी यांनी सांगितले.

रथावर फुलांची आकर्षक सजावट

रथावर भगवे ध्वज, झेंडू, शेवंती अन गुलाबांच्या फुलांच्या माळा, आंब्यांच्या पानांचे तसेच नारळांचे तोरण, आकर्षक रोषणाई, केळीचे खांब अन ऊसाची मोळी लावून रथ सजविण्यात आला होता.

सोंगांची सवाद्य मिरवणुकी
रथोत्सवात भवानी मातेचे रुप मानल्या जाणाऱ्या सोंगाकडून अध्यात्माचा प्रचार केला जात असतो. प्राचीन काळापासून वर्षानुवर्षापासून सुरु असलेल्या या लोककलेतून महिषासुरमर्दिनीच्या रुपातील सोंगाची सवाद्य मिरणवणुक काढली जाते. यात ढोल ताश्यांच्या गजरात शहरातील चौकात सोंगे नाचत होती. या सोंगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

भजनावर थिरकली तरुणाई

रथोत्सवात वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळाकडून प्रभू श्रीरामांची भजने गायली जात असल्याने उपस्थित तरुणांनी भजनांवर ठेका धरला असल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/970991937058770/

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/427079792034545/

Protected Content