शेवगे बुद्रुक येथील विवाहितेची विष घेवून आत्महत्या

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील ३० वर्षीय विवाहितेने विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील रहिवाशी प्रविण शंकर

कोळी यांची पत्नी वैशाली प्रविण कोळी (वय-३०) यांनी मंगळवार ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतात विषारी औषध घेवून आत्महत्या केली. प्रविण कोळी यांनी तातडीने पोराळा येथील कुटीर रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. वैद्यकिय अधिकारी यांच्या खबरीवरून पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्ष लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद साळी करीत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content