शेदुर्णी परिसरात बांधावर मिळणार शेतकऱ्यांना डीझेल

शेंदूर्णी प्रतिनिधी | निर्मल पेट्रोलियम वरखेडीच्या फिरते डिझेल इंधन सेवेचा समारंभपूर्वक शुभारंभ करण्यात आला. या फिरत्या डीझेल सेवेद्वारे परिसरातील खेड्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलँड, ट्रक ,डंपरसाठी घरपोच डिझेल विक्री सेवा पुरविण्यात येणार आहे.

फिरते डीझेल सेवे अंतर्गत ६ हजार लिटर क्षमतेच्या डिझेल, टँकरवर ऑटो डिझेल पंप बसविण्यात आला आहे. त्याद्वारे डिझेल व बिलिंग सुविधाही पुरविण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त खर्च न लागता डिझेल पंपावरील दरात शेतकऱ्यांच्या दारात डिझेल विक्री करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना डिझेल पंपावर इंधन भरायला येतांना लागणारा दोन, तीनशे रुपयांचा खर्च वाचणार आहे. शिवाय वेळेची बचत होणार आहे. यावेळी फिरते डिझेल सेवा पंपाची फीत कापून वाहनात डिझेल भरण्यात आले व सेवा सुरवात करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डीगंबर पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून संजय गरूड ,दगडू विष्णू पाटील, ज.जि. म.सह.बँक संचालक नाना पाटील, अशोक चौधरी, एज्युकेशन संस्था सचिव सतिश काशीद, जामनेर सं.गां.नि.समिती अध्यक्ष प्रदीप लोढा, भाजप नेते उत्तम थोरात, माजी सरपंच सागरमल जैन, मा.पं.स.सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, जिनप्रेस चेअरमन कैलास पाटील, राष्ट्रवादीचे विलास राजपूत, अरविंद चितोडीया, वाकोदचे जय पांढरे, ,बिलवाडी सरपंच यशवंत पाटील,भराडी सरपंच भागवत पाटील ,सूनसगाव सरपंच दत्ता साबळे,भागवत पाटील गोंदेगाव,जामनेर ता.रा.युवक अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील,शहर अध्यक्ष जितेंद्र पाटील,संदीप हिवाळे,पंकज पाटील चिलगाव, विजय भावसार बिलवाडी, इच्छाराम राजपूत, मनोज पाटील,अरुण मोरे जंगीपुरा व परिसरातील सरपंच व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार स्नेहदीप गरूड,अमरीश गरूड,शिवराज गरूड,साईराज गरूड, मनोज पाटील,गजानन धनगर, प्रदीप धनगर, रवी गुजर ,विलास अहिरे, धीरज जैन,फारूक खाटीक,महेश भदाणे,यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी निर्मल पेट्रोलियम संचालक स्नेहदीप गरूड यांनी आभार मानले.

Protected Content