कट मारण्याच्या नादात सफरचंदने भरलेला ट्रक पलटी

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील पाल शेरी नाकाजवळ सफरचंदने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

 

याबाबत माहिती अशी की, जम्मू येथून पाल मार्गे मध्यप्रदेशात जाणारा सफरचंदने भरलेला ट्रकने कट मारण्याच्या नादात ट्रक पलटी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. यामुळे ट्रक मध्ये असलेले सफरचंदचे बॉक्स बाहेर पडले होते. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या आहे. तसेच ये-जा करणारे वाहने घटनास्थळी थांबून सफरचंदच्या पेट्या नेत होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मध्यप्रदेशातील पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली आहे.

Protected Content