यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चितोडा येथे शेतीच्या वादावरून फिर्याद न देणाऱ्याला शिवीगाळ करून हातपाय कापण्याची धमकी दिल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद न देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकड्डन मिळालेली माहीती अशी की, जयश्री धांडे राहणार चितोडा तालुका यावल यांना चितोडा शिवारातील शेतात गैरतक्रारदार शुभम धांडे व आदीनी तक्रारदार यांना माझ्या शेतातुन जर कुणी कपाशी नेली तर मी त्याचे हातपाय तोडुन टाकेल अशा शब्दात शेतीच्या सामाईक बांधावरून धमकी व शिवीगाळ केली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात जयश्री धांडे राहणार चितोडा वय २९ वर्ष यांनी फिर्याद दिल्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.