मैत्रेय ठेवीदारांचे मंत्री अनिल पाटील यांना निवेदन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी हिवाळी अधिवेशनात मैत्रेस ठेवीदारांच्या रकम परत देण्याच्या प्रश्न मांडावा या मागणीसाठी मैत्रेय ठेवदारांनी मंत्री अनिल पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

अमळनेर येथे मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानी मैत्रेय ठेवीदार आणि नामदार अनिलजी पाटील यांच्यामधील मैत्रेय प्रकरणाविषयी सखोल चौकशी करण्यात आली. सदर मैत्रेय प्रकरण हे चौकशीच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेल्या ६ वर्षांपासून खितपत पडून असून सदर प्रकरणाला गती प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे मंत्रि महोदयांनी सांगितले.

सदर प्रकरणाची मला माहिती असून ४ वर्षांपूर्वी  हे प्रकरण मी पाचोराच्या आ. शोर पाटील यांच्यासोबत विधानसभेत लक्षवेधी मांडली आहे. मैत्रेय मध्ये माझे नातेवाईक जवळचे मित्र सहकारी यांचाही पैसा अडकलेला आहे. सदर प्रकरणाबाबत गृहमंत्र्यांबरोबर बैठक लावून मी प्रयत्नशील राहील असे आश्वासन मंत्री पाटील यांनी ठेवीदारांना दिले.

याप्रसंगी  डी .बी.पाटील ,रमेश पाटील ,योगेश पाटील ,नानासाहेब पाटील, पिंटू दर्डा ,राजेंद्र देवरे, सुभाष पाटील ,सुरेश खैरनार , गुलाबराव पाटील, पुष्पा पाटील, शोभा पाटील ,लिलाबाई पाटील व असंख्य ठेवीदार व पिंटू दर्डा यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

Protected Content