Home क्राईम शेतीच्या बांधावरून पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ

शेतीच्या बांधावरून पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतीच्या बांधावरून झालेल्या हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना आभोणे शिवार येथे समोर आली आहे. शेतात काम करत असलेल्या ६१ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर आणि त्यांच्या मुलावर कुऱ्हाड, लोखंडी सळई तसेच लाठ्या-काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथे गुलाब अमिर पिंजारी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. २० मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता आपल्या मुलासह आभोणे शिवारातील शेतात काम करत होते. यावेळी शेतीच्या बांधाच्या कारणावरून वाद उफाळून आला. कळमडू येथील रहिवासी असलेल्या अनवर शाबुद्दीन पिंजारी, अब्दुल शाबुद्दीन पिंजारी, असपाक शाबुद्दीन पिंजारी, लुकमान शाबुद्दीन पिंजारी, नसरुद्दीन दगा पिंजारी, मुन्नाबाई अब्दुल पिंजारी, अफसाना अमजद पिंजारी, रुकसार असपाक पिंजारी आणि अमजद शाबुद्दीन पिंजारी या ९ जणांनी दोघांवर हल्ला चढविला.

संशयित आरोपींनी हातातील कुऱ्हाड, लोखंडी सळई आणि लाठ्या-काठ्यांचा वापर करत गुलाब पिंजारी यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात वृद्धाच्या डोक्यावर, पाठीवर, छातीवर आणि बरगड्यांवर गंभीर दुखापत झाली आहे. हल्ला केल्यानंतर ‘तुम्हाला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विश्वास देशमुख हे करीत आहे.


Protected Content

Play sound