शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज ; अर्थमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आली आहे. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना १० हजार कोटींची मदतही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली.

 

 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी २० लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत मदत पॅकेजची माहिती दिली. यावेळ त्यांनी एकूण ८ घोषणा केल्या. यांपैकी ३ घोषणा स्थलांतरित कामगार, २ छोटे शेतकरी आणि १-१ घोषणा मुद्रा लोन, फेरीवाले, घरे आणि आदिवासी क्षेत्रातील रोजगारांची संबंधीत होती. गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांसाठी अनेक पावलं उचलण्यात आले असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली. लॉकडाऊन दरम्यान ७४,३०० कोटींपेक्षा जास्त किंमतीची किमान आधारभूत खरेदी करण्यात आली. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत १८,७०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६,४०० कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. हर्बल आणि औषधी वनस्पतींना मोठी मागणी आहे. 10 लाख हेक्टरमध्ये हर्बल शेती केली जाणार असून औषधी वनस्पती लागवडीसाठी 4 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मधमाशी पालनासाठी ५०० कोटींची योजना असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. पाळीव प्राण्याच्या लसीकरणासाठी मदत केली जाणार असून 53 कोटी जनावरांना लस दिली जाणार असल्याची माहिती निर्मला सितारमण यांनी दिली. पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी 13 हजार 300 कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

Protected Content