डोनाल्ड ट्रम्प यांच्या जेवणासाठी खास सोन्याची भांडी !

download 4

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या कुटुंबासाठी खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली भांडी तयार करण्यात आली आहेत. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला याच सोन्या-चांदीचा मुलामा दिलेल्या थाळीत जेवण दिले जाणार आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली आणि अहमदाबादमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. डिझाइन केलेल्या या खास गोल्ड प्लेटेड भांडीत ट्रम्प आणि त्यांचे कुटुंब ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करणार आहे. सोन्याच्या मुलामा असलेल्या या भांड्यांमध्ये कपसेटपासून ड्रायफ्रूट ठेवण्याची कटलरी सुद्धा आहे. सोन्याचा मुलामा दिलेला खास नॅपकिन सेटही बनवण्यात आला आहे. जयपूरच्या अरुण पाबुवाल यांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबासाठी खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली भांडी तयार केली असून वेगवेगळया धातूंचा समावेश केलेल्या या थाळयांना सोन्या-चांदीचा मुलामा देण्यात आला आहे.

Protected Content