जालन्यात बारावीच्या हिंदीची प्रश्नपत्रिका व्हॉट्सएपवर ; ८ जणांविरुद्ध गुन्हा

 

exam 390x220

जालना (वृत्तसंस्था) जालन्यातील परतुरमध्ये बारावीची हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सएपवर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी शाळेतील शिक्षकांसह ७ जणांना ताब्यात घेतले आहे.

परतूर शहरातील लालबहाददूर शास्त्री विद्यालयात शनिवारी हिंदीचा पेपर होता. परंतू पेपर सुरु होताच, प्रश्नपत्रिका व्हॉट्सएपवर आली. त्यांतर काही शिक्षक झेरॉक्स सेंटर चालकाकडून विद्यार्थ्यांमार्फत कॉप्या पुरवण्याचे काम करत असल्याच समोर आले आहे. पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ७ जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार झाला आहे.

Protected Content