चाळीसगाव,प्रतिनिधी । शेतकरी बांधवांनी शासनाच्या कृषी विषयक योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या सह देशाचा विकास करावा. शेतक-यांसाठी शासनाच्या योजना थेट बांधावर आणण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी चैतन्य तांडा येथे केले.
तालुका कृषी अधिकारी चाळीसगाव यांच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान 2020 – 21 अंतर्गत पीक प्रात्यक्षिक हंगाम रब्बी पीक हरभरा वाणाचे वाटप आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते चैतन्यतांडा येथील 25 लाभार्थ्यांना करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी व्ही.यू. सूर्यवंशी यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी एस.ई.चव्हाण, शेखर पाटील, खोत,ढिकले, दासरवाड आदी कृषी सहाय्यकांनी सहकार्य केले. कार्यक्रमास भाजपा संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, सरचिटणीस अमोल चव्हाण, सरपंच अनिता दिनकर राठोड, उपसरपंच आनंदा शिवराम राठोड, करगाव वि.का.सो.चेअरमन दिनकर राठोड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, ग्रा.पं. सदस्य वसंत बाबू राठौड़, प्रवीण वसंत चव्हाण, राजू चव्हाण, अनीता चव्हाण, भीमा राठोड, अरुणाबाई पवार, सूत्र संचालन सतीश राठोड यांनी केले. दिनकर राठोड यांनी आभार मानले.