शेतकऱ्याच्या शेतातून कापूस व तुरीच्या शेंगांची चोरी

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रोझोदा येथील शेतकऱ्याच्या शेतातून कापूस आणि तूर असा एकूण ८६ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून येण्याचे समोर आले आहे. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भरत प्रमोद लिधुरे (वय-२८) रा. रोझोदा ता. रावेर हा तरुण शेतकरी असून त्यांनी रावेर शिवारातील सावखेडा ते कोचुरगार्ड रस्त्यावर नफ्याने शेती केलेले आहे. या शेतात त्यांनी कापूस व तुरीची लागवड केलेली आहे. ३० नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शेतातील ९ किंटल कापूस आणि १ क्विंटल तुरीच्या शेंगा असा एकूण ८६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार गुरुवार १ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. शेतकरी भरत लिलुरे यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मजहर पठाण करीत आहे.

 

Protected Content