शेतकऱ्याची शेतात गळफास घेवून आत्महत्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भोकर येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याने शेतात दोरीने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

राजेंद्र मधुकर चौधरी (वय-४२) रा. भोकर ता. जळगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भोकर येथे राजेंद्र चौधरी हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. रविवारी  १७ जुलै रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे गाढोदा रोडवरील शेतात गेले होते. त्यांचा मुलगा धिरज याने त्यांना काही कामासाठी फेान लावला. परंतु त्याचे वडील राजेंद्र चौधरी हे फोन उचलत नसल्याने धिरज हा आजोबांना घेवून शेतात गेला. यावेळी त्याला आपल्या वडीलांनी शेतातील बांधावर असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे सकाळी ११ वाजता दिसून आले. धिरव व त्याच्या आजोबांनी राजेंद्र चौधरी यांना उचलून धरत झाडाचा दोर कापून त्यांना खाली उतरविले असता तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट होते.

 

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी ईश्वर लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content