रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील ६६ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात लिंबाच्या झाडाखाली विषारी औषध (सोलूशन) घेवून आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील कुसूंबा खुर्द येथील सुधीर राजाराम जावळे (वय-६६) हे शनिवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेले होते. दरम्यान, त्यांच्या मुलांनी त्यांचा शोधा-शोध केली असता त्यांचा मृत्युदेह त्यांच्याच शेतात लिंबाच्या झाडाखाली आढळून आल्याने आला त्यांनी विषारी औषध (सोलूशन) घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले असुन त्यांच्याकडे साडे सहा एकर शेती असून त्यात केळी लागवड केली आहे. त्यांच्यावर पाच लाखाचे कर्ज असल्याचे त्यांचा मुलगा राहुल जावळे यांनी सांगितले.