भोणे फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांना उडविले !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगावकडून अमळनेर येथे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरील दोघांना भरधाव डंपरने उडविल्याची घटना भोणे फाट्याजवळ घडली आहे. यात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. खासदार उन्मेशदादा पाटील हे या रस्त्याने जात असतांना अपघात झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी जखमीस तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव येथून अमळनेरकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडविल्याची घटना रविवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या अपघातात एक ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही व्यक्ती हे डी-मार्टचे कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, खासदार उन्मेश पाटील हे रस्त्याने जात असतांना अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेवून जखमीला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात रूग्णालयात रवाना केले आहे. खा. उन्मेश पाटील यांनी जिल्हा शासकीय रूग्णालय आणि डी-मार्टच्या प्रशासनाशी मोबाईलवर संपर्क साधून माहिती देण्यात आली आहे. अपघातातील दोघांची नावे अद्याप कळू शकले नाही.

Protected Content