शेतकऱ्यांच्या सूचनांचा कृषी धोरण ठरवताना विचार करणार – दादा भुसे

mumbai baithak

जामनेर, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्याचे नवे कृषिमंत्री माननीय ना. दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील निवडक १०० शेतकरी, कृषी तज्ञ, शास्त्रज्ञ, वरिष्ठ कृषी अधिकारी, राज्यातील शेतकरी संघटनांचे अध्यक्ष यांची संयुक्त बैठक दि.१७ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीला जिल्ह्यातून कृषिभूषण समाधान पाटील, रविंद्र महाजन यांनाही निमंत्रीत केले होते.

 

या बैठकीला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे मा.पाशा पटेल, सदाभाऊ खोत, दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणारे प्रकाश पोहरे, कृषी आयुक्त एकनाथ डवले आदी मान्यवर उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीलाच कृषिमंत्री भुसे यांनी ही बैठक राज्याचे कृषी धोरण ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे राजकीय विषय बाजूला ठेऊन आपण यापुढील काळात काम करायचे आहे, असे नमूद केले.

बैठकीला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना शेती करतांना येणाऱ्या अडचणी, समस्या कृषी योजना राबवताना येणाऱ्या अडचणी त्यातील त्रुटी, योजनांमधील बदल, शेतकऱ्यांच्या गरजा त्यांनी जाणून घेतल्या व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सर्व प्रयत्न केले जातील, शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांचा कृषी धोरण ठरवताना निश्चित विचार केला जाईल, असे उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी आश्वस्थ केले. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून मते जाणून घेणारे राज्याच्या इतिहासातील पाहिले कृषीमंत्री असल्याच्या भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या व कृषी मंत्र्यांचे आभार मानले.

Protected Content