पहूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – जामनेर तालुक्यातील सोनाळा शिवारातील शेतातून शेतकऱ्याच्या २५ हजार रुपये किमतीच्या ठिबक नळ्यांची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत शनिवारी २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र आनंदा पाटील (वय-५३) रा. सोनाळा ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उतरनिर्वाह करत असतात. २५ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान त्यांच्या शेतात ठेवलेल्या २५ हजार रुपये किमतीचे ठिबक नळ्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. या संदर्भात शेतकरी रवींद्र पाटील यांनी सर्वत्र माहिती घेतली असता चोरी झाल्या संदर्भात काहीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.