अतिक्रमण विभागाशी धक्काबुक्की करणाऱ्या बाप-लेकास अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ परिसरात महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाला आरेरावीची भाषा व शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील शनीपेठ परिसरात घाणेकर चौकातील ओक मंगलकार्यालय येथे रस्त्यावर भाजीपाला विक्रत्यांना भाजीपाला न विकण्याचे सांगितले. त्यांनी काही भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावर लावलेले दुकाने बंद करून निघून गेले. मात्र शेख फारूख शेख यासीन आणि तौफिक शेख फारूख दोन्ही रा. काट्या फायईल, शनीपेठ यांनी अतिक्रमण विभागाशी वाद घातला. आरेरावीची भाषा केल्यानंतर शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अतिक्रमण विभागाचे मनपा कर्मचारी ज्ञानेश्वर तुकाराम कोळी यांच्या फिर्यादीवरून शेख फारूख शेख यासीन आणि तौफिक शेख फारूख यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

दोघांना केली अटक
अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, सलिम पिंजारी, रविंद्र पाटील, परीस जाधव, अभिजित सैंदाणे, अनिल कांबळे, राहुल धेटे, राहुल पाटील यांनी कारवाई करत दोघांना आज अटक केली आहे. पुढील कारवाई पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content