शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणगावात भाजपचे आंदोलन !

धरणगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना युरिया व रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत. तसेच त्यांचा काळाबाजार थांबवावा. ज्वारी, मका, कापूस खरेदी करावा, तसेच शेतकऱ्यांचा मालाचा पैंसा त्वरित अदा करण्यात याव, दुधाचे शासकीय खरेदी दर वाढवावेत, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, अशा विविध मागण्यांसाठी धरणगावात भाजपाचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, शिरीषआप्पा बयस, तालुकाध्यक्ष संजय महाजन, चंद्रशेखर अत्तरदे यांच्या नेतृत्वात भाजपने आज आंदोलन केले.

 

तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पेरणी करून पिके उभी केली आहेत. या पिकांना रासायनिक खतांची आवश्‍यकता आहे. मात्र, तालुक्‍यातील अनेक भागांत रासायनिक खतांचा कृतीम तुटवडा निर्माण केला जात आहे. शेतकरी खत विक्रेत्यांकडे वारंवार हेलपाटे मारत असून खते चढ्या दराने शेतकऱ्यांना विकली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना बांधावर खते पुरविण्याचे सांगितले होते. त्याचे काय झाले? असा सवाल देखील भाजपने विचारला आहे. या प्रमुख मागण्या दोन दिवसात पूर्ण न झाल्यास जनआंदोलन करण्यात येईल,असा इशारा देऊन सुद्धा तहसीलदार,कृषी अधिकारी,खत कंपन्या इत्यादी दखल घेतली नाही म्हणून शेतकऱ्यांचे हाल रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रास्तारोको शेतकरी जनआंदोलन केले. यावेळी गटनेते कैलास माळी सर यांनी प्रास्ताविक केले. अँड.संजय महाजन भाषणात म्हणाले की, हे तिघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे, यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. तर पी.सी.आबा म्हटले की, सरकारने केलेल्या घोषणे प्रमाणे शेतकऱ्यांना बांधावर खते द्या, पालकमंत्री कुठे आहेत, खत न मिळाल्यास पालकमंत्रीना घेराव घालू असा इशारा दिला. सुभाष अण्णा म्हणाले शेतकऱ्यांचे हाल करणाऱ्या तिघाडी सरकारचा निषेध असो. या मतदारसंघाचे मंत्री गुलाबराव पाटील संध्याकाळच्या कार्यक्रमात मशगुल राहतात. त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. परंतु दारु दुकानवाल्याची चिंता आहे, असे आरोप करत शेतकरी बाबत सरकारला जाब विचारण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारचा निषेधही व्यक्त केला.

 

यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, शिरीषआप्पा बयस, तालुकाध्यक्ष संजय महाजन, माजी सभापती पुनीलाल महाजन, अँड.वसंत भोलाणे, शेखर पाटील, सुनील वाणी, मधुकर रोकडे, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद धनगर, ललित येवले, गुलाब मराठे, भालचंद्र माळी, कडू बयस, दिलीप महाजन, सुनील चौधरी, भास्कर मराठे, प्रल्हाद पाटील, कडू महाजन, कांतीलाल माळी, रामचंद्र मराठे, कन्हैया रायपूरकर, विजय महाजन, मधुकर पाटील, राजु महाजन, सुदाम मराठे, शरद भोई, वासुदेव महाजन, महेंद्र महाजन, सचिन पाटील, अमोल महाजन, रविंद्र मराठे, शुभम चौधरी, अनिल बडगुजर, विक्की महाजन, विकास चव्हाण, पिंटू कंखरे, विशाल महाजन, अमृत मराठे, सदाशिव महाजन, राजाराम महाजन, रतीलाल महाजन, गुलाब धनगर, राजू धनगर, विशाल मराठे यांच्या आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content