शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाचोऱ्यात धरणे आंदोलन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव द्यावा, पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी यासह इतर प्रलंबित विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या वैशाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात पाचोरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 केंद्र सरकार परदेशातून कापूसाच्या गाठी आयात करीत असल्याने स्थानिक बाजारपेठेत कापसाचे भाव कमी झाले आहेत, याशिवाय शासन सोयाबीन तूर आयात करीत असल्याने ते त्वरित थांबवावे, गायरान अतिक्रमण नियमीत करणे, शेतकऱ्यांना २४ तास विजपुरवठा करावा, खानदेशात कापसाचे प्रमुख पीक असून त्यास योग्य भाव मिळत नसल्यामुळे व कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कापूस विकण्यास धजावत नाही यामुळे उधारीवर घेतलेलं बीयाणे खते औषधी याच्या परत फेडण्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा लावला आहे, शेतकरी चौबाजूने भरडला जात आहे, कापसाला १० हजार रुपये भाव मिळावा, सोयाबीन तूर, सुर्यफुलाला ८ हजार रुपये भाव मिळावा, शेती पंपाची मागील वसुली माफ करा, पाचोरा भडगाव तालुक्याचा पोखरा योजनेत समावेश करावा, अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी अशी विविध मागण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, जिल्हा प्रमुख दिपक राजपूत, उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, तालुका प्रमुख शरद पवार, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख रमेश बाफना यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

पाचोरा येथील तहसिलदार कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलनात तालुका प्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख अनिल सावंत, अॅड. दिपक पाटील, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, फयीम शेख, देविदास पाटील, बापू पाटील, निलेश गवळी, खंडू सोनवणे, माजी नगरसेवक दत्ता जडे, धर्मेंद्र चौधरी, सुनील डांबले, ज्ञानेश्वर चौधरी, प्रेमचंद पाटील, अन्ना परदेशी, रमेश पाटील, धरमसींग पाटील, पप्पू जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, तिलोत्तमा मौर्य, मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील, सौ. कुंदन पांड्या, जितेंद्र जैन, रितेश जैन राजेंद्र राणा, शांताराम माळी, छोटूसिंग पाटील, अतुल चौधरी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते

Protected Content