चाळीसगावात शिवसेनेतर्फे कोवीड रूग्णालयास ‘बेड’चे लोकार्पण

चाळीसगाव प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेनेच्या वतीने शहरातील नवीन कोविड रुग्णालयास बेड देण्यात आले तर रुग्णालय आवारात वृक्षारोपण केले आहे. धुळे रोड येथील श्रीराम नगर येथे देखील वृक्षारोपण करण्यात आले.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ‘वाढदिवसाच्या निमित्ताने मिळणाऱ्या सर्व शुभेच्छा, मी कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहे,’ असं त्यांनी स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हस्ते देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत कुठेही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लावू नयेत किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहनही त्यांनी शिवसैनिक व हितचिंतकांना केलं होते. चाळीसगाव शिवसैनिक पदाधिकारी यांनी चाळीसगाव येथे लोकसहभागातून होणाऱ्या नवीन कोविड सेंटरला नविन बेड देत रुग्णालयाच्या परिसरातच वृक्षरोपण करून केलेल्या आवाहनानुसार वाढदिवस साजरा केला. यात प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी बी. पी. बाविस्कर, ग्रामीण वैद्यकीय अधिकारी देवराम लांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील,तालुका प्रमुख रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड, माजी नगरसेवक संजय ठाकरे, उपशहर प्रमूख शैलेंद्र सातपुते, रामेश्वर चौधरी, रघुनाथ कोळी, प्रभाकर ओगले, नकुल पाटील, दिनेश विसपुते, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सविता कुमावत व महिला आघाडी, शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content