गणरायाच्या आगमनाच्या पुर्वसंध्येला भाविकांची गर्दी होण्याची शक्यता

पाचोरा प्रतिनिधी । गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे हिंदू परंपरेतील सर्व सणांवर निर्बंध आले आहेत. हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा मानला जाणारा गणेशोत्सव या वर्षीही साध्याच पद्धतीने साजरा करण्यात येणार असून गणरायाच्या आगमनाच्या पुर्वसंध्येला भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पुर्वी प्रमाणे गणेशोत्सव साजरा न करता घरगुती वातावरणात गणरायाची स्थापना करण्यात येत आहे.  पुर्वी अनेक श्री. गणेश मंडळे आप आपल्यापरिने कॉलनी भागात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याकडे मोठा कल होता. मात्र दोन वर्षांपासुन कोरोनाची पार्श्वभूमी पाहता शासनाने काही निर्बंध घातले असल्यामुळे घरगुती वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भक्तगणांची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!