मुक्ताईनगरात श्री संत मुक्ताई महिला जेष्ठ मंडळातर्फे कार्यक्रम

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री संत मुक्ताई महिला जेष्ठ मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील श्री संत मुक्ताई महिला जेष्ठ मंडळ मार्फत महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात शहरातील पेंशनर भवन येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खा. खडसे यांनी महिला मंडळींना मार्गदर्शन करून संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह किर्तनकार ह.भ.प.सौ.दुर्गा मराठे, अध्यक्ष सुशिला निळे, सचिव राजकन्या जोगी, कोषाध्यक्ष आशाबाई, विजया बोंडे, भाजपा तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, शहराध्यक्ष पंकज कोळी व शहरातील जेष्ठ महिला उपस्थित होत्या.

Protected Content