शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ठाकरे गटाचे निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासंदर्भात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्या पुर्ण करण्यास शासन असमर्थ ठरत आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रूपये भाव मिळावा, सुर्यफुलाला प्रति क्विंटल ८ हजाराचा भाव देण्यात यावा, पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, शेत पंपासाठी दिवसा पुर्ण दाबाने ८ तास वीज पुरवठा देण्यात यावा, शेतपंपाची मागील बिलांची थकबाकी माफ करावी, शेतकर्ज घेण्यासाठीची जाकट रद्द करावी या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात ठराविक वेळ मिळावा अशी मागणी केली आहे.

याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष महानंदा पाटील, महानगराध्यक्षा मनिषा पाटील, शिवसेना तालुका प्रमुख ॲड. रूपाली शिवदे, उपजिल्हा संघटक चारूलता केशव सोनवणे, गायत्री सोनवणे, पल्लवी सोनवणे, प्रमोद घुगे, भारत सोनवणे, इंदू ठाकरे यांच्यासह आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content