शेतकरी संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर

भडगाव प्रतिनिधी । शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात तालुकाध्यक्षपदी अभिमन हटकर यांची निवड करण्यात आली आहे.

शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अभिमन राघो हटकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. त्यात सर्वानुमते अभिमान राघो हटकर यांची तालुकाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली. यासोबत उपाध्यक्ष विलास देशमुख, संपर्क अध्यक्ष देविदास पाटील, उपसंपर्क अध्यक्ष काशिनाथ नरवाडे, युवा अध्यक्ष गोविंद नरवाडे, सल्लागार कन्हैय्यालाल महाजन, युवा उपाध्यक्ष वाल्मिक वाघ, शहराध्यक्ष भगवान चौधरी, उप शहराध्यक्ष मनोज परदेशी, सल्लागार हरी राठोड, सरचिटणीस जगन्नाथ मोरे, उप सरचिटणीस नीलेश पवार, कार्यकारिणी सदस्य – सुभाष पाटील, लक्ष्मण पाटील, प्रकाश राठोड, भगवान पाटील, उमेश धनगर, अशोक पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, शांताराम आचारी यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, तालुक्यातील शेतकर्‍यांनी या संघटनेचे सभासद होण्यासाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क साधून शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करावे, असे आवाहन अध्यक्ष हटकर यांनी केले.

Protected Content