पारोळा , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुका कृषी कार्यलयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या तोडकी असल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत असून ही रिक्त पदे त्वरित न भरल्यास शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदारांना ठिय्या आंदोलन व रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
निवेदनाचा आशय असा की, पारोळा तालुका कृषी कार्यालयात रिक्त असलेल्या पदांबद्दल योग्य तो पाठपुरावा न केल्यामुळे तालुका कृषी कार्यालयाला विविध योजना येऊन देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकत नसल्याने 3/4 किमी दुर असलेल्या या कृषी कार्यालयात शेतकरी पायपीट करत जातो. परंतु, निराशा पदरी घेऊन परत जावे लागते. पारोळा कृषी कार्यालयात अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने सुमारे 4/5 वर्षापासून कृषी कार्यालय नामधारी म्हणून अस्तित्वात उभे आहे. 44 कर्मचाऱ्यांची संख्या असतांना 114 खेड्याचा भार फक्त 8 कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने आठही कर्मचाऱ्यांसह शेतकरी वाऱ्यावर असल्याचे दिसून येते असे मत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नेते डॉ. पृथ्वीराज पाटील व्यक्त केले. तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून जागतिक बँक व महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्प योजनेअंतर्गत पोखरा योजनेचे तालुक्यात 36 गावे आहेत.तसे अटल भु योजना 21 गाव अशा या कृषी कार्यालयाच्या विविध योजना कर्मचाऱ्यांच्या अभावी धूळखात पडून आहेत. दुष्काळात होरपळलेल्या या तालुक्याच्या नशिबी हालच हाल असून अशाच विविध कारणांमुळे या तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे. शेतकऱ्यांच्या विविध योजनांमध्ये महा डीबीटी योजनेला आनलाईन तांत्रिक प्रणालीद्वारे राबविण्यात येत असतात परंतु कृषी विभागाच्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोयी सुविधांच्या अभावामुळे अडचणी येतात. पारोळा कृषी कार्यालयाचा काही भाग जिर्ण व पडका झाला असून त्या ठिकाणी तांत्रिक प्रणाली राबविण्यासाठी विजेची उपकरणे, पंखे, तुटलेल्या व मोडक्या खुर्च्या, मोडकळीस आलेले टेबल अशी अवस्था पाहता कर्मचारी कसे काम करतील याची जाणीव वरिष्ठांना नसल्यानेच वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे पारोळा तालुका कृषी कार्यालयासह कर्मचारी व शेतकऱ्यांचे हाल होत आहेत असे ते डॉ. पाटील यांनी नमूद करत या अति महत्त्वाच्या ल शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याची जाण लोकप्रतिनिधी व कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न घेतल्यास 1 एप्रिल पासून रास्ता रोको व ठिय्या आंदोलनाचा इशारा देखील देऊन असंख्य कष्टकरी शेतकऱ्यांसह पारोळा तहसीलदार व कृषी कार्यालयात निवेदन देऊन दिला आहे. निवेदन देतांना शेतकरी संघटनेचे जातो जेष्ठ कार्यकर्ते उमेश नाना पाटील, भिम आर्मी संघटनेचे जितेंद्र वानखेडे, विश्वास पाटील, दिलीप पाटील, दिपक पाटील, संजय पाटील व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.