शेतकरी आंदोलन समर्थकांचा पंजाबमधील जिओ टॉवर्सवर हल्ला

 

चंडीगड, वृत्तसंस्था । मागील महिन्यापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी पंजाबमध्ये काही गटांनी राज्यातील रिलायन्स जिओच्या मोबाईल टॉवर्सवर हल्ला केला आहे. यामुळे राज्यातील जिओच्या ग्राहकांना रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

दिल्लीतील शेतकारी आंदोलकाना समर्थ करणाऱ्या गटांनी पंजाबमधील जीओच्या एक हजार ३०० टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित केला आहे. पंजाबमध्ये जिओचे नऊ हजार टॉवर्स आहेत. यापैकी अनेक टॉवर्सला वीजपुरवठा करणाऱ्या वायर्स आंदोलकांनी कापल्याचे समजते. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी अंबानी आणि अदानी सारख्या बड्या उद्योजकांनाही विरोध केला आहे. शेतकऱ्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी ग्रुप्सच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहनही केलं आहे. शेतकऱ्यांनी या दोन्ही कंपन्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. शेतकरी जीओचं सीमकार्ड घेऊ नका असा प्रचार करतानाच जीओचे सध्याचे कनेक्शनही रद्द केले जात होते, असं या श्रेत्रातील तज्ज्ञ मंडळी सांगतात.

Protected Content